Uttar pradesh-प्रतापगडमध्ये रीलसाठी धोकादायक स्टंट; व्हिडिओ व्हायरल, पोलिसांचा तपास सुरू

प्रतापगड (उत्तर प्रदेश) : सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी एका दाम्पत्याने केलेला धोकादायक स्टंट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. प्रतापगड येथील नगर कोतवाली परिसरातील बेल्हा देवी मंदिर घाटावर हा प्रकार घडला.

व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या हातांनी मोटारसायकल उचलताना दिसत असून, त्याची पत्नी बाइकवर बसलेली आहे. चित्रपटातील दृश्यासारखा हा स्टंट धार्मिक स्थळी शूट करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

प्रकरणाची दखल घेत स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला असून, सार्वजनिक ठिकाणी धोकादायक वर्तन आणि धार्मिक स्थळाचा गैरवापर केल्याप्रकरणी पुढील कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *