मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर आधारित असल्याची चर्चा असलेल्या महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल या आगामी मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबईत सुरू असून, चित्रपटातील अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
शूटिंगदरम्यान समोर आलेल्या छायाचित्रांमुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले आहे.
चित्रपटाच्या कथानकाबाबत निर्मात्यांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नसली तरी महाराष्ट्रातील काही गाजलेल्या घटनांवर हा चित्रपट भाष्य करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, चित्रपटातील ‘भोंदू खरात’ या चर्चेत असलेल्या पात्राची भूमिका कोणता अभिनेता साकारणार याबाबत निर्मात्यांनी अद्याप गोपनीयता कायम ठेवली असून, त्याबाबतची घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
