Mumbai-मुंबई उपमहापौर संजय घाडी यांची शहरात अधिकृत निवासस्थानाची मागणी; वाहतूक कोंडीमुळे मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याचा दावा

मुंबई : मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे शहरात अधिकृत निवासस्थान उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. दहिसर येथून दररोज मुंबई शहरातील महापालिका मुख्यालयापर्यंत प्रवास करताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, त्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

पत्रात घाडी यांनी उपमहापौर म्हणून विविध प्रशासकीय बैठका, कार्यक्रम आणि अधिकृत कामकाजासाठी वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मात्र, दहिसर ते दक्षिण मुंबई हा दररोजचा लांबचा प्रवास आणि वाहतूक कोंडीमुळे मोठ्या प्रमाणात वेळ वाया जात असल्याने अधिकृत जबाबदाऱ्या पार पाडण्यात अडचणी निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबई शहर परिसरात महापालिकेकडून अधिकृत निवासस्थान उपलब्ध करून देण्यात यावे, अशी विनंती त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. उपमहापौरांच्या या मागणीची महापालिका प्रशासनाकडून काय दखल घेतली जाते, याकडे आता लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *