Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

बांगलादेशी महिलेसह नऊ महिलांची सुटका लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

By Team News Beez
April 16, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने चिखली परिसरात एका लॉजवर धडक कारवाई करत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. लक्ष्मी चौक येथील आदित्य लॉजवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी नऊ पीडित महिलांची सुटका केली. यामध्ये बांगलादेशातून तस्करी करून आणलेल्या एका महिलेचाही समावेश आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि दहशतवाद विरोधी सेलने १३ एप्रिल रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही कारवाई केली. देहू-आळंदी रोडवरील आदित्य लॉजमध्ये लॉजच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करत लॉज मॅनेजर अशोक बाबुराव बाबर आणि कामगार अकिबुल खालेक मुल्ला, लॉज चालक सुदर्शन पवार, जागा मालक नाना बोराटे आणि मॅनेजर साहील ऊर्फ शाहीन शिराजुल मंडल यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सुटका करण्यात आलेल्या ९ महिलांपैकी एका महिलेला आरोपींनी बांगलादेशातून तस्करी करून भारतात आणले होते. पोलिसांनी या पीडित महिलेची सुटका केली असून, तिला पुन्हा मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांकडून कारवाईचा धडका
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सन २०२६ मध्ये आतापर्यंत एकूण ११ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये ७ मसाज पार्लर/स्पा सेंटर आणि ४ हॉटेल्सचा समावेश आहे. या सर्व कारवायांमध्ये आतापर्यंत ३१ आरोपींना अटक करण्यात आली असून २८ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

Tags:

Akibul Khaleque MullaLodge Manager Ashok Baburao Babar
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

मोई गावात शेजाऱ्याकडून दगडाने मारहाण; तरुण गंभीर जखमी

Next

पिंपरीमध्ये वाहनांवर कोसळली भिंत

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला दारूबंदी पथकाने...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बँक खाते वापरण्‍यास देऊन ११ लाखांची सायबर फसवणूक

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी...

Read More
July 23, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme