पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – पिंपरी येथे रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या वाहनांवर भिंत कोसळली ही घटना गुरुवारी (दि. १६) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली.
पिंपरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून स्वर्गीय इंदिरा गांधी उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या रोडवर थ्रीसन कृप कंपनी समोर जीर्ण अवस्थेतील इमारत आहे. या इमारतीच्या बाजूला वाहने पार्क केली जातात. गुरुवारी दुपारी जीर्ण झालेल्या इमारतीची भिंत अचानक कोसळली. ही भिंत पार्क केलेल्या तीन दुचाकी आणि एका चारचाकीवर पडली. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी अग्निशमन विभागाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अडकलेली वाहने बाजूला काढली. रस्त्याच्या बाजूला घडलेल्या या घटनेमुळे काही वेळ बघ्यांची गर्दी झाली. यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली
पिंपरीमध्ये वाहनांवर कोसळली भिंत
