पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – पोलिसांनी दोन वर्षांसाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या आरोपीला कोयत्यासह अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. २० जून) रात्री १०.४० वाजण्याच्या सुमारास, चिखली येथील भीमशक्तीनगरमध्ये करण्यात आली.
गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस कॉन्स्टेबल रामदास मेरगळ यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतिश उत्तरेश्वर तरंगे (वय २४, रा. म्हेत्रे वस्ती, चिखली) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतिश याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी १२ मार्च २०२६ रोजीच्या आदेशानुसार दोन वर्षांकरिता तडीपार केले होते. असे असतानाही आरोपी कोणतीही परवानगी न घेता तो शहरात आला. तसेच त्याच्या ताब्यातून ५०० रुपये किमतीचा हस्तगत केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
