चिखलीत पिस्टलसह एकाला अटक

पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – चिखली परिसरात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणार्‍या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. श्रीराम हौसिंग सोसायटीजवळ गुरुवारी (दि. 30 एप्रिल) रोजी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आली.
विश्वजीत सर्जेराव मंडले (वय 26 वर्षे, रा. सानेचौक, चिखली, मूळ रा. सातारा) याला अटक केली आहे. चिखली पोलीस ठाण्यातील हवालदार किरण बबन काटकर यांनी गुरुवारी (दि. 30 एप्रिल) रोजी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात 29 एप्रिल ते 12 मे या कालावधीत शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही, आरोपी चिखली येथील श्रीराम हौसिंग सोसायटीसमोर रात्रीच्या सुमारास पिस्टल आणि दोन काडतूस घेऊन फिरताना आढळला. त्याच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले असून भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चिखली पोलीस ठाण्यातील हवालदार मरागजे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *