संघटीत सायबर गुन्हेगारी; १२ लाखांचा गंडा

पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – भोसरी येथील लांडेवाडी चौकात बँक खाते उघडून संघटीतपणे देशातील ६ नागरिकांची १२ लाख ३१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना १ जानेवारी २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत घडली.
शिवकुमार अमोलराव धोटे (रा. मोर्शी, जि. अमरावती) व त्‍याचे साथीदार यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. पोलीस शिपाई पुजा अर्जुन चव्हाण यांनी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संघटीत गुन्हेगारीच्या उद्देशाने बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते उघडून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केले व ७ नागरिकांची १२ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *