तडीपार गुंडाला कोयत्‍यासह अटक

पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला आरोपी शहरात कोयता घेऊन फिरताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री साडेदहा वाजताच्‍या सुमारास क्रांतीनगर, आकुर्डी येथील सार्वजनिक रस्‍त्‍यावर करण्‍यात आली आहे.
​या प्रकरणी आरोपी गोपाळ अंकुश हळनोर (वय २५, रा. जय गणेश हौसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) असे पोलिसांनी अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई प्रदिप पावरा यांनी शुक्रवारी (दि. १५ मे) रोजी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोपाळ हळनोर याला पोलीस उप-आयुक्तांनी ७ जानेवारी २०२६ रोजी पुणे जिल्हा, शहर आणि ग्रामीण हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार केले होते. तरीही कोणतीही परवानगी न घेता तो शहरात वावरत होता. आकुर्डी येथील क्रांतीनगर भागात सार्वजनिक रस्त्यावर तो २०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता घेऊन फिरत असताना पोलिसांनी त्याला पकडले. पोलीस हवालदार डगळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *