pimpri chinchwad crime-फुगेवाडीत ‘थार’मधून कोयता घेऊन फिरणाऱ्या युवकाला अटक
पिंपरी, दि. १६ pimpri chinchwad crime) – आपल्या महिंद्रा थार गाडीतून कोयता बाळगून एका दुचाकीस्वाराला धमकावणाऱ्या तरुणाला खंडणी विरोधी पथकाने फुगेवाडी येथे अटक केली आहे.
ही कारवाई गुरुवारी (दि. १४ मे) रोजी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.
मानव भिमराव पंडीत (वय २१, रा. मोशी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार भुपेंद्र खंडू चौधरी यांनी शुक्रवारी (दि. १५ मे) रोजी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुगेवाडी येथील ग्रेडसेपरेटरजवळ आरोपी मानव पंडीत हा आपल्या काळ्या रंगाच्या महिंद्रा थार (क्रमांक एम.एच-१४-एम. व्ही-०१२२) मधून जात होता.
त्याच्याकडे ५०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता मिळून आला असून, त्याने रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला धमकावल्याचा आरोप आहे.
दापोडी पोलिसांनी याप्रकरणी शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस फौजदार शेळके तपास करीत आहेत.