Pimpri-Chinchwad – टास्कच्‍या नावाखाली साडेसहा लाखांची फसवणूक

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – कासारवाडी येथील भगिरथी कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या एका महिलेची १९ ते २४ मे २०२६ दरम्यान वेगवेगळ्या टेलिग्राम अकाउंट्सद्वारे टास्क पूर्ण करून नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने सहा लाख ४८ हजार ७४३ रुपयांची फसवणूक करण्यात आली.
​लक्ष्मी गुप्ता, अर्जुन सिंग व कस्टमर सपोर्ट आयडी धारकांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. लवीना कुलदिप रावल (वय २९, रा. कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी टास्क पूर्ण केल्यावर बोनस व पैसे परत मिळतील असे खोटे आश्वासन देऊन फिर्यादीकडून ऑनलाइन पैसे जमा करून घेतले. पैसे परत मागितले असता खाते फ्रीज झाल्याचे सांगून शिवीगाळ करत फसवणूक केली. पुढील तपास दापोडी पोलीस करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *