Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

Pimpri-Chinchwad-महापालिकेचा धोकादायक हलगर्जीपणा; स्ट्रक्चरल ऑडिटशिवाय शहरात उभे शेकडो होर्डिंग्ज! किवळे दुर्घटनेचा धडा विसरला; पावसाळा सुरू तरी आकाशचिन्ह विभागाची कारवाई शून्य, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By Sumedh Chapalgaonkar
June 25, 2026 2 Min Read
0

पिंपरी-चिंचवड :
किवळे मधील होर्डिंग दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला होता. तरीही पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यातून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. शहरात शेकडो मोठे जाहिरात फलक उभे आहेत. मात्र त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट अद्याप झालेले नाही. पावसाळा सुरू झाला असतानाही आकाशचिन्ह परवाना विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे.

यंदा शहरात दोन वेळा अवकाळी पाऊस झाला. मात्र त्यावेळी वादळी वारे नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पण पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कमकुवत झालेली होर्डिंग्ज कोसळल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. तरीही प्रशासनाने अद्याप होर्डिंग्जच्या सुरक्षिततेची तपासणी सुरू केलेली नाही.

पिंपरी-चिंचवड शहरातून मुंबई बेंगलोर महामार्ग पुणे मुंबई जुना महामार्ग आणि पुणे नाशिक महामार्ग असे तीन प्रमुख रस्ते जातात. या रस्त्यांच्या कडेला परिसरात आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या इमारतींवर अनेक मोठे जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. मात्र शहरातील अनेक होर्डिंग बेकायदा असल्याचे वेळोवेळी निष्पन्न झाले आहे. तरीदेखील या अनाधिकृत होर्डिंग वर कारवाई करण्यास महापालिका का धजावत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांचा फिटनेस अहवाल महापालिकेकडे सादर करणे आवश्यक असते. धोकादायक फलक तातडीने हटविण्याची जबाबदारीही प्रशासनाची असते. मात्र यंदा आकाशचिन्ह परवाना विभागाने एजन्सीधारकांना नोटीस देणे तर दूरच, साध्या सूचना देखील जारी केलेल्या नाहीत.

मागील वर्षी काही मोजक्या होर्डिंग्जची तपासणी करण्यात आली होती. यंदा मात्र एकाही होर्डिंगचा फिटनेस अहवाल महापालिकेकडे जमा झाल्याची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे शहरातील अनेक लोखंडी सांगाडे कोणत्याही तपासणीशिवाय नागरिकांच्या डोक्यावर उभे आहेत.

दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. किवळेसारखी घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी ती टाळण्यासाठी आधीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

नागरिकांनी महापालिकेकडे शहरातील सर्व अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग्जची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली आहे. धोकादायक ठरणारे फलक तत्काळ हटवावेत. तसेच रस्त्या शेजारच्या परिसरातील नियमबाह्य होर्डिंग्जवर कठोर कारवाई करून पिंपरी-चिंचवडकरांच्या जीविताची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी होत आहे.

Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

New Delhi-‘ब्रिक्स अंतरिक्ष अर्थव्यवस्था’ जागतिक विकासाची पुढील महत्त्वाची सीमा; केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

Next

Mumbai-आषाढी वारीचा सोहळा जगभर झळकणार; भाविकांच्या सुविधांसाठी व्यापक नियोजन करा – मुख्यमंत्री फडणवीस

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme