रोटरी क्लब ऑफ पिंपरी चा सुवर्ण वर्ष पदग्रहण समारंभ दिनांक 21 जून 2026 रोजी रोटरी कम्यूनिटी सेंटर चिंचवड येथे उत्साहात पार पडला.
क्लबचे नुतन अध्यक्ष श्री बाबा भापकर यांनी माजी अध्यक्ष श्री आनंद संपत यांच्या कडून पदभार स्वीकारला. नवीन संचालक मंडळ मध्ये सचिव श्री सिधार्थ बोस , खजिनदार श्री प्रतीक पारेख व इतर सदस्यांची यांची नियुक्ती करण्यात आली.
श्री बाबा भापकर हे माजी पोलीस सहआयुक्त श्री सोपानराव भापकर यांचे सुपुत्र होत.
या सुवर्ण महोत्सवी वर्षात अनेक समाज उपयोगी प्रकल्प व कौशल्य विकास योजनांवर भर करण्याचे नियोजन असुन. सुवर्ण वर्ष आजी माजी सदस्यां सोबत उत्साहात पार पाडणार असल्याचे अध्यक्ष श्री बाबा भापकर यांनी सांगितले.
क्लबचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री प्रमोद बाकरे , धनंजय भिंगे , डॉ विभा जुत्शी मॅडम , समीर रासने , लोकेश जैन , तसेच उद्योजक व सदस्य श्री राजेंद्र भोसले , संदीप डांगे , संतोष गिरंजे , अभिजीत शिंदे , रोहन रोकडे उपस्थीत होते.
प्रमुख अतिथी भावी प्रांतपाल श्री चारू श्रोत्री यांनी मार्गदर्शन केले.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मधून श्री संजय कारवा ,डॉ . परवेज , सौ अस्मिता पाटील , श्री योगेश गायकवाड , श्री भालचंद्र लेले आदी मान्यवर उपस्थीत होते.
सूत्र संचालन श्री कुशल शहा व सौ ख्याती शहा यांनी केले.
Pimpri-Chinchwad-रोटरी क्लब ऑफ पिंपरी पदग्रहण समारंभ.
