गजानन हाऊसिंग सोसायटी सह अन्य अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामावर पिंपरी महापालिकेची कारवाई

फ प्रभाग कार्यालयाच्या वतीने ३५० चौरस मीटर क्षेत्रातील दोन इमारतींवर कारवाई

पिंपरी, दि. ४ जून २०२६: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एफ प्रभाग कार्यालयाच्या वतीने गजानन हाउसिंग सोसायटी व परिसरातील अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सुमारे ३५० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या दोन इमारतींवरील अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात आले.

 

ही कारवाई फ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईसाठी महापालिकेचे ३० जवान, १० पोलीस कर्मचारी, संबंधित बिट निरीक्षक तसेच बांधकाम परवानगी विभागाचे उपअभियंता उपस्थित होते.

 

परिसरातील बहू मजली अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासाठी जॉ क्रशर या यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. तसेच इतर अनधिकृत बांधकामावर प्रभावी कारवाई करण्यासाठी Jaw Crusher मशीनही मागविण्यात आली असून पुढील टप्प्यात संबंधित बांधकामांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

 

महापालिकेच्या क्षेत्रीय विभागामार्फत शहरातील अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून नागरिकांनी कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घेऊनच बांधकाम करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत संरक्षण दिले जाणार नसून शहरातील नियोजनबद्ध विकासासाठी अशा कारवाया यापुढेही नियमितपणे सुरू राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *