pimpri chinchwad crime-कुदळेवस्ती परिसरात अल्पवयीन मुलाकडून पिस्तुल जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पिंपरी, दि. 29 (pimpri chinchwad crime)
मोशीतील कुदळेवस्ती परिसरात एका अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून, पोलीस हवालदार विजय दीपक दौंडकर यांनी मंगळवारी (दि. 28 एप्रिल) रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याच्या टाकीजवळ रोडवर हा मुलगा 51 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस घेऊन थांबला होता.

पोलीस सह आयुक्तांनी शहरात घातलेली शस्त्रबंदी लागू असतानाही त्याने या आदेशाचा भंग केल्याचे कारवाईत स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *