प्राणांतिक अपघात प्रकरणी पीएमटीच्‍या चालकावर गुन्‍हा

पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – आळंदी येथे पीएमटी बस पार्क करत असताना बसच्या चाकाखाली चिरडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ११ मे) रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास पीएमटी बस स्टॉप, आळंदी येथे घडली.
या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र कोल्हे यांनी सोमवारी (दि. ११ मे) रोजी आळंदी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस चालक हनुमान ज्ञानोबा जाधव (वय २७, मुळ रा. कापसी, परभणी; सध्या रा. पुणेकर बिल्डिंग, चाकण चौक, आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बस चालकाने आळंदी पीएमटी स्टॉपवर बस पार्क करत असताना परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे बस चालवली. यावेळी बसच्या उजव्या बाजूच्या मागील चाकाखाली अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील एक अनोळखी पुरुष आला. बसचे चाक डोक्यावरून गेल्याने या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीने जांभळ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेली होती. या व्‍यक्‍तीबाबत कोणाला अधिक माहिती असल्‍यास त्‍यांनी आळंदी पोलीस ठाण्‍याशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास आळंदी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *