पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – घरात कोणी नसल्याची संधी साधून चुलत भावाने कपाटातील दागिने आणि रोख रक्कम चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. ११ मे) रोजी सकाळी ६.०० ते दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान मनोहरनगर, तळेगाव दाभाडे येथे घडली.
याप्रकरणी सूरज विजयकुमार गायकवाड (वय ३७, रा. मनोहरनगर, तळेगाव दाभाडे) यांनी सोमवारी (दि. ११ मे) रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी उत्तम गायकवाड (वय ४०, रा. मोरखंडी, जि. बिदर, कर्नाटक) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूरज आणि त्यांची पत्नी कामावर गेलेले असताना त्यांचा चुलत भाऊ उत्तम घरी आला होता. त्याने घरातील बेडरुममध्ये असलेल्या उघड्या लोखंडी कपाटाच्या लॉकरमधून एक लाख २९ हजार ५०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेली. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
चुलत भावानेच लुटले भावाचे घर; सव्वा लाखाचे दागिने चोरीला
