Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Uncategorized

pimpri chinchwad-पिंपरी-चिंचवड परिसरात पोलिसांचा मोठा दणका वेगवेगळ्या छाप्यांमध्ये लाखो रुपयांची अवैध हातभट्टी दारू जप्त

By Sumedh Chapalgaonkar
May 31, 2026 2 Min Read
0

​पिंपरी, दि. ३१ (pimpri chinchwad) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करत मानवी जिवाला धोकादायक असणारी अवैध हातभट्टी दारू आणि दारू बनवण्याचे रसायन जप्त केले आहे. या मोहिमेत देहुरोड, शिरगाव, हिंजवडी, पिंपरी, बावधन, चिंचवड, म्हाळुंगे आणि आळंदी परिसरात पोलिसांनी दारू माफियांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी या कारवाईत मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
​देहुरोड (एम. बी. कॅम्प): गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने सात रुपये किमतीची ७० लीटर तयार हातभट्टी दारू जप्त करून आरोपी राजेश श्रीरंग कदम (वय ५३, रा. देहुरोड) याच्‍यावर गुन्‍हा दाखल केला.
​शिरगाव (पुसाणे): ओढ्याकाठी ५० हजार रुपये किमतीचे १००० लीटर दारू तयार करण्याचे गुळमिश्रित रसायन जप्त करण्यात आले. पोलिसांचा छापा पडताच आरोपी महिला स्नेहा वासुदेव नानावत (रा. पुसाणे) ही घटनास्थळावरून पळून गेली.
​हिंजवडी (मानरोड): एका पत्र्याच्या शेडमधून साडेपाच हजार रुपयांची तयार गावठी दारू जप्त करण्यात आली असून, आरोपी धनराज सोमाजी नट याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​पिंपरी (आंबेडकर चौक): खंडणी विरोधी पथकाने एक ऑटो रिक्षा (एमएच १४ सीयु ०३९३) पकडून त्यातून होणारी ८१ हजार ९५० रुपयांची अवैध दारू वाहतूक उघडकीस आणली. याप्रकरणी गामरबहादूर ढकळ (वय ४६) आणि संतोष रनवरे (वय ३०) या दोघांवर गुन्‍हा दाखल केला आहे.
​बावधन (कृष्णा कॉम्प्लेक्स): शुभांगी शंभू चौहान (वय ३६) या महिलेकडून १७ हजार ८०० रुपयांचा बेकायदेशीर प्रोव्हिबिशन माल जप्त करून कारवाई करण्यात आली.
​चिंचवड (गुरुद्वारा रोड): नंद डेअरीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत १५ हजार रुपये किमतीची १५० लीटर तयार गावठी हातभट्टी दारू विकताना सायली अमर राठोड (वय २०) या तरुणीला पोलिसांनी पकडले.
​दक्षिण म्हाळुंगे (निघोजे व म्हाळुंगे): निघोजे येथील ओढ्याकाठी ७ हजार २०० रुपयांच्या दारूसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. तर सिग्मा चौकात पाच हजार रुपयांची ५० लीटर दारू सोडून आरोपी दुरेश रमेश राठोड (वय ३३) हा पोलिसांना पाहून पळून गेला.
​पिंपरी (भाटनगर इमारती): बिल्डिंग नं. ६ मध्ये पोलिसांनी दोन वेगवेगळ्या खोल्यांवर छापे टाकले. तिसऱ्या मजल्यावरून तुलसी मनोज रावळकर (वय ५०) हिच्या खोलीतून ८ हजार ८०० रुपयांचे कच्चे रसायन, तर चौथ्या मजल्यावरून वर्षा सुरेश भाट (वय ४०) हिच्या खोलीतून पाच हजार २०० रुपयांचे रसायन व गॅस सिलेंडर, बर्नर जप्त करण्यात आले.
​आळंदी (चऱ्होली खुर्द): ज्ञानसागर मंगल कार्यालयाच्या पाठीमागे पाच हजार २५० रुपये किमतीची १०५ लीटर तयार हातभट्टी दारू बाळगल्याप्रकरणी निर्मला संभा राजपूत (वय ५८) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
​या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांचे पोलीस उपनिरीक्षक आणि अंमलदार पुढील तपास करीत आहेत.

Tags:

Police make a big splash in Pimpri-Chinchwad areaseize illegal hand-brewed liquor worth lakhs of rupees in various raids
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

Mumbai-FPI चा विक्रीचा धडाका मे महिन्यातही कायम; 33 हजार कोटी रुपये भारतीय बाजारातून काढून घेतले, नेमकं कारण काय?

Next

pimpri chinchwad-ताथवडे, पुनावळे, वाकड सेवा रस्त्यांचे काम प्राधान्याने मार्गी लागणार – आमदार शंकर जगताप

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला दारूबंदी पथकाने...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बँक खाते वापरण्‍यास देऊन ११ लाखांची सायबर फसवणूक

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी...

Read More
July 23, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme