पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – कासारवाडी येथील नाशिक फाटा परिसरात दुकान भाड्याने घेतल्याच्या कारणावरून एका व्यापाऱ्याला मारहाण करून त्याची सोन्याची साखळी हिसकावून घेतली. ही घटना रविवारी (दि. ७ जून) रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली.
प्रविण कुवरपाल शर्मा (वय ४६, रा. पुनावळे, पुणे) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रिषभसिंह संतोषकुमार सिंग (वय २७, रा. तळवडे) आणि लवकुश हरीगेन सिंग (वय २६, रा. बिजलीनगर, चिंचवड) या आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेरा इन्पीरीयम गेट वे जवळील एक दुकान फिर्यादी यांनी भाड्याने घेतल्याचा राग आरोपींच्या मनात होता. या रागातून आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली व त्यांचा टी-शर्ट फाडून गळ्यातील दोन लाख २५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने चोरून नेली. फिर्यादीच्या पत्नीलाही शिवीगाळ करत ‘व्यवसाय करू देणार नाही’ अशी धमकीही दिली. पुढील तपास दापोडी पोलीस करीत आहेत.
दुकान भाड्याने घेतल्याच्या रागातून व्यापाऱ्याला मारहाण
