दापोडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – रेल्वे स्टेशन जवळ सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. १० मे) सायंकाळी दापोडीतील लिंबोरे वस्‍ती येथे करण्यात आली.
अशोक जगन्नाथ भालेसैन (वय ५२), विशाल ज्ञानेश्वर सोनवणे (वय ४४), चेतन किसन भाडाळे (वय ३६), मनोज दिलीप पवार (वय ४०, सर्व रा. दापोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर जाधव यांनी रविवारी (दि. १० मे) रोजी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दापोडी रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूला असलेल्या लिंबोरे वस्‍ती येथील एका पत्रा शेड मध्ये तीन पत्‍ती नावाचा जुगार खेळत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २४ हजार ५० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. दापोडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *