पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त केले आहेत. ही कारवाई शनिवारी (दि. ९ मे) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास साठे वस्ती, चऱ्होली येथे करण्यात आली.
वाघेश्वर कृष्णा रसाळ (वय १९), अथर्व तानाजी शिंदे, कृष्णा वाघोले (सर्व रा. चऱ्होली) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाबाजी जाधव यांनी रविवारी (दि. १० मे) रोजी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास साठे वस्ती चऱ्होली येथील वाघेश्वर विद्यालयाजवळ तिघेजण कोयता घेऊन आले असल्याची माहिती दिघी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८०० रुपये किमतीचे दोन कोयते जप्त केले आहेत. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा
