July 23, 2026

दापोडीत बेकायदेशीर गावठी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा

0
WhatsApp Image 2026-04-14 at 9.07.37 PM

दापोडी परिसरात बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. ही कारवाई सोमवारी (१३ एप्रिल) सायंकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास दापोडीतील विश्वासचाळ येथे करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संतोष सपकळ यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नारायण दुर्गा साळवी (४९, सिध्दार्थनगर, दापोडी, पुणे) याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वासचाळ येथील पवार यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत आरोपी बेकायदेशीरपणे दारूची विक्री करत होता. पोलिसांनी छापा टाकून त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीची १०० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त केली आहे. आरोपीला नोटीस बजावण्यात आली असून दापोडी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed