देहूफाटा परिसरातील लॉजवर पोलिसांचा छापा

पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – आराम लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर दिघी पोलिसांनी छापा टाकून एका पिडीत महिलेची सुटका केली आहे. ही कारवाई रविवार (दि. १९ एप्रिल) रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास देहूफाटा, आळंदी येथे करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अरुण डामसे यांनी रविवारी (दि. १९ एप्रिल) रोजी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश बाबाजी डुंबरे (वय ३२, रा. देहूफाटा, आळंदी) याला अटक केली आहे. त्याच्यासह विजय गणेश शेट्टी (देहूफाटा, आळंदी) याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी एका महिलेला कामाचे आमिष दाखवून तिला वेश्या व्यवसायास प्रवृत्त केले. या व्यवसायातून मिळालेल्या पैशातून ते आपली उपजीविका भागवत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *