पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – रुपीनगर परिसरात एका दुकानदाराला गांजाच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन लाखो रुपये आणि सोन्याची अंगठी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १ मार्च २०२५ पासून १९ एप्रिल २०२६ या कालावधीत रुपीनगर, तळवडे येथे घडली.
याप्रकरणी कैलास भास्कर चौधरी (वय ४७, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी रविवारी (दि. १९ एप्रिल) रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन उर्फ तानाजी नायकुडे (रा. रुपीनगर, तळवडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा एका महिलेसोबत जुना व्यवहार पूर्ण झालेला असतानाही, आरोपीने ते पैसे मी दिले होते, असे सांगत पुन्हा जुन्या पैशांची मागणी करत त्यांना धमकावले. पैसे न दिल्यास शॉप बंद पाडण्याची आणि शॉपमध्ये गांजा आणून ठेवून जेलमध्ये पाठवण्याची धमकी त्याने दिली. या भीतीपोटी फिर्यादीने आरोपीला आजवर सात लाख ९ हजार ९०० रुपये रोख, एक सॅमसंग फोन आणि ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी दिली आहे. आता आरोपी पुन्हा एक लाख ७० हजार रुपयांची मागणी करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
तळवडे येथे दुकानदाराला धमकावून सात लाखांची खंडणी उकळली
