पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) – पारवा पकडण्यासाठी लावलेल्या तारेच्या फासाच्या कारणावरून झालेल्या वादात एका मजुराला लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना डुडुळगाव येथे मंगळवारी (दि. 21 एप्रिल) रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली आहे.
ज्ञानेश्वर अशोक कव्हर (रा. डुडुळगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. मिथुन बिरसिंग राठोड (वय 33, रा. हवालदार वस्ती, मोशी आळंदी रोड, मोशी) यांनी बुधवारी (दि. 22 एप्रिल) रोजी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 एप्रिल रोजी सायंकाळी डुडुळगाव येथील आय लव्ह बिर्याणी हाऊस जवळ पारवा पकडण्यासाठी तारेचा फासा का लावला या कारणावरून वाद घातला. रागाच्या भरात आरोपीने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या मनगटावर आणि डाव्या पायाच्या गुडघ्यावर प्रहार केला, ज्यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणाचा तपास दिघी पोलीस करत आहेत.
क्षुल्लक कारणावरून मजुराला बेदम मारहाण
