Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पुणे

Pune-‘भक्ती विठ्ठलाची, सेवा आरोग्याची’; आषाढी वारीसाठी आरोग्य विभागाची अभूतपूर्व तयारी, लाखो वारकऱ्यांसाठी सर्वसमावेशक आरोग्य व्यवस्था सज्ज

By Sumedh Chapalgaonkar
July 7, 2026 2 Min Read
0

पुणे : आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने व्यापक आणि अत्याधुनिक नियोजन केले आहे. “भक्ती विठ्ठलाची, सेवा आरोग्याची” या ब्रीदवाक्याखाली आजपासून श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदी येथे आरोग्य सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. ७ जुलै ते २९ जुलै या संपूर्ण वारी कालावधीत पालखी मार्गावरील प्रत्येक टप्प्यावर आरोग्य सुविधा उपलब्ध राहणार आहेत.

आरोग्य विभागाने यंदा १९२ वैद्यकीय पथके, १३३ वैद्यकीय अधिकारी, ३७८ आरोग्य कर्मचारी, ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ४४ आरोग्य उपकेंद्रे वारकऱ्यांच्या सेवेत तैनात केली आहेत. याशिवाय पालखी मार्गावर दर दोन किलोमीटरवर रुग्णवाहिका उपलब्ध राहणार असून, पालखीसोबत २४ तास कार्यरत सहा फिरती वैद्यकीय पथके संपूर्ण प्रवासात सेवा देणार आहेत.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी १७६ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये १०८ आपत्कालीन सेवेंतील ALS (Advanced Life Support) आणि BLS (Basic Life Support) रुग्णवाहिका तसेच १०२ सेवेंतील रुग्णवाहिकांचा समावेश आहे.

वारकऱ्यांना प्राथमिक उपचार त्वरित मिळावेत यासाठी ४,५०० औषध किट दिंडी प्रमुखांना वितरित करण्यात येणार आहेत. या किटमध्ये ताप, वेदना, पोटाचे विकार, अॅलर्जी, निर्जलीकरण आणि किरकोळ जखमांवरील उपचारासाठी आवश्यक औषधे, ओआरएस, मलम आणि प्राथमिक उपचार साहित्याचा समावेश करण्यात आला आहे.

महिला व बालकांच्या सुविधांवरही विशेष भर देण्यात आला आहे. पालखी मार्गावर १५ निवारा केंद्रे उभारण्यात आली असून येथे विश्रांती, उपचार आणि रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध असेल. तसेच स्तनदा माता आणि बालकांसाठी १२ हिरकणी कक्ष सुरू करण्यात आले असून स्वतंत्र विश्रांती व आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी २०० पाण्याचे टँकर्स आणि ९८ फिलिंग पॉइंट्स कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक टँकरमधील पाण्याची गुणवत्ता तपासल्यानंतरच त्याचा वापर केला जाणार असून, खाजगी टँकर्सच्या तपासणीसाठी दर पाच किलोमीटरवर विशेष तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत.

अन्नातून पसरणारे आजार रोखण्यासाठी पालखी मार्गावरील हॉटेल्स, ढाबे आणि उपहारगृहांची नियमित तपासणी केली जाणार आहे. शिळे किंवा अस्वच्छ अन्न विक्रीवर नियंत्रण ठेवले जाणार असून, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणीही अनिवार्य करण्यात आली आहे.

यंदाच्या वारीत प्रथमच दीर्घकालीन आरोग्य सुविधांचा विचार करत ‘आषाढी पालखी विकास आराखडा’ तयार करण्यात आला आहे. पालखी मार्गावरील निवडक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कायमस्वरूपी अतिदक्षता विभाग (ICU) उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेलाही मोठी चालना मिळणार आहे.

आषाढी वारीदरम्यान प्रत्येक वारकरी सुरक्षित, निरोगी आणि वेळेवर वैद्यकीय सेवांच्या कक्षेत राहावा, यासाठी आरोग्य विभागाने उभारलेली ही सर्वसमावेशक यंत्रणा वारी व्यवस्थापनातील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. श्रद्धा, सेवा आणि सुयोग्य नियोजनाचा संगम घडवत यंदाची वारी अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

Delhi-दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; ‘कॉकरोच जनता पार्टी’चे X खाते पुन्हा सुरू करण्याचे आदेश

Next

E20 पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा एकही पुरावा दाखवा; नितीन गडकरींचे आव्हान

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme