कुदळवाडीमधील अवैध दारू अड्ड्यावर छापा

​पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणावर पोलिसांनी छापा टाकून माल जप्त केला. ही कारवाई ११८ जुलै रोजी कुदळवाडी येथील विसावा चौकातील एका पत्राशेडमध्ये करण्‍यात आली.
रोहित देशी राठोड (वय २१, रा. कुदळवाडी, चिखली) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई निरज गुलाब नाईक यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पत्राशेडमध्ये सात हजार ६७० रुपये किमतीच्या देशी व विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या बाटल्या विनापरवाना विक्रीसाठी बाळगताना आढळून आला. त्याला नोटीस देण्यात आली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *