बेकायदेशीर कोयता बाळगणाऱ्याला अटक
पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे लोखंडी कोयता बाळगणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई १८ जुलै रोजी आळंदी येथील शिवण्या बियर बार समोर सार्वजनिक ठिकाणी करण्यात आली.
शिवदास उर्फ नितीन राजाभाऊ लवटे (वय २२, रा. चाकण, मूळ परभणी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट तीनमधील पोलीस शिपाई समीर कुंडलीक काळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सार्वजनिक रस्त्याच्या कडेला ५०० रुपये किमतीचा कोयता बेकायदेशीरपणे बाळगून उभा होता. पोलीस आयुक्तालयाच्या शस्त्रबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकाने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.