पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – औंध जिल्हा रुग्णालयाजवळ पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगणार्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 30 एप्रिल) रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.
पोलीस हवालदार आशिष ज्ञानदेव बनकर यांनी गुरुवारी (दि. 30 एप्रिल) रोजी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अर्थव सोपान मारणे (वय 19, रा. आंबेगाव पठार, कात्रज) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी येथील पॉवर हाऊसजवळ आरोपी 51 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस बाळगताना आढळला. शहरात शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही त्याने या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर शस्त्र अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.
पिस्टलसह विद्यार्थ्यास अटक
