Pune-पावसाची कमतरता; शेतकऱ्यांना पेरणी टाळण्याचा सरकारचा सल्ला

पुणे(pune) : महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत मोठी तूट नोंदवली गेली असून राज्यात केवळ सुमारे 26 टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे.

हवामानातील अनिश्चिततेमुळे राज्यातील अनेक भागांत अद्याप पुरेसा आणि सातत्यपूर्ण पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरणीसाठी आवश्यक असलेली जमीन ओलावा स्थिती तयार झालेली नाही, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात पावसाची कमतरता अधिक जाणवत असून काही ठिकाणी उष्णतेची तीव्रताही कायम आहे. त्यामुळे पेरणीसाठी घाई न करता योग्य पावसाची वाट पाहावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

दरम्यान, पुढील काही दिवसांत मान्सूनची स्थिती सुधारण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांनी बियाणे आणि पेरणीच्या तयारीबाबत सावधगिरी बाळगावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *