Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

झेप्टो’विरोधात वाकडमध्ये रहिवाशांचा एल्गार; २०० हून अधिक नागरिकांनी ॲप केले डिलीट

By Team News Beez
May 25, 2026 2 Min Read
0

डिलिव्हरी बॉईजच्या कथित त्रासाने संताप; सुकासा सोसायटीत सुरक्षा, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा तापला

​ पिंपरी-चिंचवड :
वाकडमधील दत्ता मंदिर रोड परिसरातील सुकासा सोसायटीमध्ये ‘झेप्टो’ कंपनीविरोधात नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. डिलिव्हरी बॉईजचा वाढता वावर, अंतर्गत रस्त्यांचा बेफाम वापर, महिलांना होणारा कथित त्रास आणि सुरक्षेचा प्रश्न यामुळे रहिवाशांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. संतप्त नागरिकांनी कंपनीविरोधात अनोखा निषेध नोंदवत तब्बल २०० हून अधिक जणांनी आपल्या मोबाईलमधून ‘झेप्टो’ ॲप डिलीट केले.

​या आंदोलनामुळे वाकड परिसरात मोठी खळबळ उडाली असून निवासी भागात सुरू असलेल्या क्विक-कॉमर्स वेअरहाऊसच्या कामकाजावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

​सोसायटीत वाढला बाहेरील लोकांचा वावर
​रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, सोसायटीलगत सुरू करण्यात आलेल्या झेप्टोच्या वेअरहाऊसमुळे परिसरात दिवसरात्र डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची गर्दी वाढली आहे. अनेक कर्मचारी सोसायटीच्या आवारात थांबत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

​काही वेळा मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन होत असल्याचाही आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

‘सुरक्षा भिंत पाडून वेअरहाऊस’चा आरोप
​सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, झेप्टोच्या वेअरहाऊससाठी परिसरातील सुरक्षा भिंतीचा भाग पाडण्यात आला. यामुळे बाहेरील लोकांचा प्रवेश वाढला आहे. त्याच परिसरात स्नूकर क्लब सुरू झाल्याने रात्री उशिरापर्यंत वर्दळ वाढत असल्याची तक्रारही रहिवाशांनी केली आहे.

​“सोसायटीच्या सुरक्षेचा पूर्ण प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही,” अशी प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

​मुख्य गेटमधूनच डिलिव्हरी वाहतूक
​झेप्टोच्या गोदामासाठी स्वतंत्र प्रवेशमार्ग नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे डिलिव्हरी बॉईज थेट सुकासा सोसायटीच्या मुख्य गेटमधून ये-जा करत असल्याचे सांगण्यात आले.

​दिवसभर दुचाकींची वर्दळ सुरू असल्याने अंतर्गत रस्त्यांवर धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली.

​‘ॲप डिलीट’ आंदोलनाने वेधले लक्ष
​रविवारी सोसायटीत विशेष मोहिम राबवण्यात आली. यामध्ये रहिवाशांनी एकत्र येत मोबाईलमधील ‘झेप्टो’ ॲप हटवण्याचा निर्णय घेतला. २०० हून अधिक नागरिकांनी कंपनीला आर्थिक संदेश देण्यासाठी ॲप डिलीट केल्याचे सांगितले.

​“आमच्या सुरक्षेपेक्षा व्यवसाय मोठा असू शकत नाही. वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने आम्हाला हा मार्ग स्वीकारावा लागला,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

​निवासी भागातील वेअरहाऊसबाबत नवा वाद
​या आंदोलनानंतर निवासी भागात सुरू असलेल्या क्विक-कॉमर्स कंपन्यांच्या वेअरहाऊसबाबत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा व्यावसायिक हितसंबंधांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे.

​दरम्यान, या प्रकरणामुळे वाकड परिसरात मोठी चर्चा सुरू असून प्रशासन आणि संबंधित कंपनी यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

​महागाईचा तिहेरी फटका! इंधन-तेलानंतर आता दुधानेही काढले पुणेकरांचे ‘दूधाचे दूध’ ​चितळे आणि गोकुळच्या दरवाढीने सर्वसामान्य हैराण; चहा, नाश्ता आणि स्वयंपाकघराचे गणित बिघडले

Next

काळेवाडीत तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; चार जणांना अटक

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme