दारूच्या दुकानात भांडण करू नका म्हटल्याने सेल्समनवर कोयत्याने वार

पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – देशी दारूच्या दुकानात भांडण करणार्‍या तरुणाला बाहेर काढल्याचा राग आल्याने त्याने सेल्समनवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. 27 एप्रिल) रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात घडली.
सूरज राजू धोगडे (वय 18, रा. वाकड) याला पोलिसांनी अटक केली आहे. अनिल बाळासाहेब ठोंबरे (वय 28, रा. शिवतेज नगर, हिंजवडी) यांनी मंगळवारी (दि. 28 एप्रिल) रोजी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल हे लक्ष्मी चौकातील एका देशी दारूच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करतात. आरोपी सूरज दुकानात येऊन भांडण करत असताना अनिल यांनी त्याला समजावून सांगत हात धरून बाहेर काढले. याचा राग आल्याने सूरजने त्यांना शिवीगाळ करत जवळ असलेल्या कोयत्याने अनिल यांच्या हातावर वार करून त्यांना जखमी केले. हिंजवडी पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *