Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

​pimpri chinchwad-सांगवी पोलिसांचा ‘थर्ड आय’ ऑन! बीआरटी लेनमध्ये घुसणाऱ्या ४ हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई

By Sumedh Chapalgaonkar
June 8, 2026 2 Min Read
0

(pimpri chinchwad)-पहिल्या पाच महिन्यांतच दंडाचा दणका; नियम मोडल्यास दुसऱ्यांदा थेट १५०० रुपये फटका; अपघातांना आळा घालण्यासाठी मोहीम तीव्र

बीआरटी (BRT) मार्ग हा केवळ सार्वजनिक वाहतुकीसाठी राखीव असतानाही, नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना सांगवी पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. सांगवी वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने बीआरटी लेनमधून बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई सुरू आहे. चालू वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांतच तब्बल ४ हजार बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे नियमबाह्य वाहन चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
​गेल्या वर्षीचा आकडा पार होणार?
​सांगवी, पिंपळे सौदागर आणि परिसरातील बीआरटी मार्गावर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. गेल्या संपूर्ण वर्षात या परिसरात सुमारे ६ हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, यंदा अवघ्या पाच महिन्यांतच हा आकडा ४ हजारांवर पोहोचला आहे. सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने आवाहन केले जात आहे. मात्र, तरीही नियमांचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
​दुसऱ्यांदा चूक केल्यास ‘दीड हजार’ दंड!
​वाहनचालकांनी बीआरटी लेनमध्ये प्रवेश करू नये, यासाठी दंडाची रक्कमही वाढवण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार:
​पहिल्यांदा नियम मोडल्यास: संबंधित वाहनचालकावर ५०० रुपये दंड आकारण्यात येतो.
​दुसऱ्यांदा तीच चूक केल्यास: दंडात तिप्पट वाढ करून थेट १,५०० रुपये दंडात्मक कारवाई केली जात आहे.
​शॉर्टकट ठरतोय जीवघेणा!
​बीआरटी मार्ग हा केवळ ‘पीएमपीएमएल’ (PMPML) च्या गतिमान बस सेवेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र, अनेक वाहनचालक वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी किंवा शॉर्टकट मारण्यासाठी या राखीव मार्गात आपली वाहने घुसवतात. बऱ्याचदा समोरून येणाऱ्या बसचा अंदाज न आल्याने किंवा वेगावर नियंत्रण न राहिल्याने समोरासमोर भीषण अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये काही नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. हे जीवघेणे अपघात रोखण्यासाठीच आता सांगवी पोलिसांनी कंबर कसली आहे.
​प्रतिक्रिया
​”बीआरटी मार्ग हा केवळ ‘पीएमपीएमएल’ बसेसच्या सुरक्षित प्रवासासाठी राखीव आहे. अन्य कोणत्याही वाहनचालकांनी या मार्गात प्रवेश करू नये. बीआरटीमध्ये घुसून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर यापुढील काळातही ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येईल.”

Tags:

Sangvi Police Third Eye on Penalty action against 4000 vehicles entering BRT lanes
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

अधिक मासाची सांगता; १५ जूननंतर लग्नसराईला वेग

Next

cricket-९३ वर्षांत प्रथमच – भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय नोंदवला

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme