पिंपरी-चिंचवड :
क्रीडा रसिकांचे लक्ष वेधून घेतलेल्या प्रतिष्ठित ‘१९ वर्षाखालील व्हेरॉक कप २०२६’ क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी चौथ्या दिवशी झालेल्या चुरशीच्या साखळी सामन्यात ‘वॉरियर्स क्रिकेट अकॅडमी’ने चमकदार कामगिरी करत ‘स्पार्क स्पोर्टिव्ह क्रिकेट अकॅडमी’वर दिमाखदार विजय मिळवला.
स्पर्धेचे आयोजक डॉ. विजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचा सामना अत्यंत चुरशीचा ठरला. दोन्ही संघांनी विजयासाठी सर्वस्व पणाला लावले होते. मात्र, वॉरियर्स क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक कामगिरी आणि अचूक रणनीतीच्या जोरावर सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली आणि स्पार्क स्पोर्टिव्ह क्रिकेट अकॅडमीला पराभवाचा धक्का दिला.
शर्वील खोब्रागडे ठरला ‘मॅन ऑफ द मॅच’
वॉरियर्स क्रिकेट अकॅडमीच्या या शानदार विजयामध्ये अष्टपैलू खेळाडू शर्वील खोब्रागडे याने अत्यंत मोलाची भूमिका बजावली. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याला आजच्या सामन्याचा ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. शर्वीलच्या खेळीने मैदानावर उपस्थित असलेल्या क्रीडाप्रेमींची मने जिंकली. स्पर्धेतील पुढील साखळी सामने अधिक रंगतदार होण्याची शक्यता असून, सर्वच संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळत आहे.
१९ वर्षाखालील व्हेरॉक कप ‘वॉरियर्स क्रिकेट अकॅडमी’ची विजयी घोडदौड शर्वील खोब्रागडे ठरला सामनावीर!
