आरटीओचा जून महिन्यातील परवाना शिबीर दौरा जाहीर ‘या’ दिवशी उघडणार कोटा

पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) वतीने माहे जून २०२६ या महिन्यामध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यांत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पक्की अनुज्ञप्ती’ (कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स) शिबीर दौऱ्याचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांना त्यांच्या हक्काच्या ठिकाणीच परवाना मिळवणे सोपे होणार आहे.

​उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिबिरासाठी ऑनलाइन स्लॉट बुकिंग म्हणजेच कोटा शुक्रवार, दिनांक २९ मे २०२६ रोजी ठीक दुपारी ५.०० वाजता खुला केला जाणार आहे. नागरिकांनी वेळेत आपला कोटा आरक्षित करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
लोणावळ्यासाठी विशेष मैदानाची व्यवस्था
​मावळ आणि लोणावळा परिसरातील नागरिकांची सोय लक्षात घेता, २९ व ३० जून रोजी लोणावळ्यात होणाऱ्या शिबिरासाठी येथील तुंगार्ली शाळेचे मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. या संदर्भात आरटीओ कार्यालयाने लोणावळा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी समन्वय साधला असून, चाचणीसाठी मैदानाचा वापर केला जाईल.

ज्या नागरिकांना पक्के लायसन्स काढायचे आहे, त्यांनी २९ मे रोजी दुपारी ५ वाजता ऑनलाईन प्रणालीद्वारे आपला स्लॉट बुक करून घ्यावा. अधिकृत कोट्याशिवाय कोणत्याही नागरिकाची चाचणी घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
​- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड*

असे आहे जून २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक (ठिकाण व तारीख):
खेड २, ३, ४ जून २०२६
मंचर ८, ९, १० जून २०२६
जुन्नर १५, १६, १७ जून २०२६
वडगाव मावळ २२, २३, २४ जून २०२६
लोणावळा २९, ३० जून २०२६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *