Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
क्राईम

नाशिक प्रकरणात ‘टीसीएस’ मलेशियाचा थेट संबंध शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांचा गौप्यस्फोट

By Sumedh Chapalgaonkar
June 8, 2026 2 Min Read
0

नाशिक प्रकरणात ‘टीसीएस’ मलेशियाचा थेट संबंध
शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांचा गौप्यस्फोट
झाकीर नाईक व ‘एमआयएम’ नेत्यांची चौकशी करावी
पॉश अंमलबजावणीत हलगर्जीपणा केल्याने ‘टीसीएस’वर कारवाई करा

नाशिकमधील टीसीएस कंपनीतल्या हिंदु महिला कर्मचाऱ्यांसोबत सक्तीचे धर्मांतरण, लैंगिक आणि आर्थिक शोषणामागे मलेशिया आणि पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असून मलेशियातील टीसीएसचा थेट संबंध असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केला. नाशिक ‘टीसीएस’ प्रकरणी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुन निरुपम यांनी मलेशियात बसलेला फरार आरोपी इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक व ‘एमआयएम’च्या नेत्यांची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच पॉश कायद्याची (POSH) अंमलबजावणी करण्यास हलगर्जीपणा केल्याबद्दल ‘टीसीएस’वर कारवाई होणे आवश्यक आहे, असे निरुपम यांनी सांगितले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

निरुपम म्हणाले की, ‘टीसीएस’ प्रकरणी न्यायालयात दाखल झालेल्या आरोपपत्रांमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पीडित हिंदू तरुणीचे धर्मांतर करण्यासाठी तिला सोशल मीडियावरील झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून तिचे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न आरोपींकडून सातत्याने करण्यात आला. या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी निदा खान, दानिश शेख, तौफिक अत्तार हे तिघेच सूत्रधार नाहीत तर त्यांच्या पाठीशी मलेशिया आणि पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय टोळ्या कार्यरत असल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे. दानिश आणि तौफिक हे पिडितेला मलेशियाला पाठवणार होते, असेही आरोपत्रात म्हटले आहे. त्यामुळे आरोपींचे मलेशियाशी थेट संबंध होते, हे स्पष्ट दिसतंय असे निरुपम म्हणाले. याच मलेशियात फरार आरोपी झाकीर नाईक लपून बसला आहे. या झाकिर नाईकची संस्था किंवा एजन्सी महाराष्ट्रात कॉर्पोरेट्समध्ये काम करणाऱ्या हिंदु मुलींना धर्मांतरासाठी टार्गेट करत आहेत का, याबाबत तपास यंत्रणांनी चौकशी करायला हवी, अशी मागणी निरुपम यांनी केली.

निरुपम पुढे म्हणाले की, या प्रकरणातील आरोपी निदा खान ४० दिवस फरार होती. पोलीसांच्या शोध मोहीमेत ती छत्रपती संभाजी नगरमधील ‘एमआयएम’चे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरी कुटुबांसह सापडली. यात निदा खान आणि नगरसेवक मतीन पटेल यांना पोलीसांनी अटक केली. पोलीस चौकशीत मतीन पटेल याने वारंवार इम्तियाज जलीलचे नाव घेतले होते. जलील हे एमआयएमचे महाराष्ट्राचे प्रमुख आणि माजी खासदार आहेत. ठाणे महापालिकेच्या मुंब्रा प्रभागात निवडून आलेली ‘एमआयएम’ची नगरसेविका मुंब्र्याला हिरवे करणार असा दावा करते. यावेळी तिच्या सोबत असलेले इम्तियाज जलील तिथं केवळ मुंब्राच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र हिरवा करणार असे जाहीर वक्तव्य करुन वाद निर्माण करतात. त्यामुळे टीसीएस प्रकरणात ‘एमआयएम’चा सहभाग असू शकतो, असा आरोप निरुपम यांनी यावेळी केला. तपास यंत्रणांनी ‘एमआयएम’च्या नेत्यांनी सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणी निरुपम यांनी केली.

संपूर्ण प्रकरण ज्या कंपनीत घडले त्या टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीवर पॉश कायद्याची (POSH) काटेकोर अंमलबजावणी करण्यास हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रातील बड्या कॉर्पोरेट्सची चौकशी करावी

नाशिकमधील टीसीएस प्रकरणाची राज्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातील आयटी, फार्मा आणि मल्टी नॅशनल कंपन्यांमध्ये महिला कर्मचारी सुरक्षितरित्या काम करत आहेत का, याबाबत पोलीस आणि राज्य सरकारने चौकशी करायला हवी, अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली.

Tags:

Shiv Sena deputy leader and spokesperson Sanjay Nirupam reveals direct connection of TCS Malaysia in Nashik case
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

*धारावी पुनर्विकास प्रकल्पाला वेग; २०२८ पर्यंत पहिली १० हजार घरे देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश*

Next

Pimpri Chinchwad -सातबार्‍यावर वारस नोंदीसाठी ७० हजारांची लाच घेताना चर्‍होलीचा तलाठी अन् खासगी इसम जाळ्यात!*

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme