Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

‘शिवरूद्र शंभुराजे’ महानाट्य हे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचविणारा स्तुत्य उपक्रम – आमदार अमित गोरखे…

By Team News Beez
May 12, 2026 2 Min Read
0

पिंपरी, १२ मे २०२६ :- छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम आणि स्वराज्यासाठीचे योगदान सर्वश्रुत असले तरी युवा पिढी आणि शालेय विद्यार्थ्यांना त्यांचा इतिहास जिवंत स्वरूपात अनुभवता यावा, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महानाट्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे ही कौतुकास्पद बाब आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी प्रत्येकाने आपल्या परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांना अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित करावे जेणेकरून प्रत्येकापर्यंत हा इतिहास जीवंतपणे अनुभवण्याची संधी मिळेल, असे आवाहन आमदार अमित गोरखे यांनी केले.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय पराक्रमाची, राष्ट्रनिष्ठेची आणि स्वराज्य रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची जाज्वल्य गाथेचा इतिहास उलगडणाऱ्या ‘शिवरूद्र शंभुराजे’ या भव्य महानाट्याच्या दुसऱ्या प्रयोगास काल प्रारंभ झाला, यावेळी आमदार अमित गोरखे हे बोलत होते.

काल झालेल्या महानाट्याच्या कार्यक्रमास नगरसदस्य तुषार हिंगे, कुशाग्र कदम, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते सागर तापकीर, राजेंद्र घावटे,संजय कुरबेट्टी, हेमा पारिसकर,जितेंद्र छाबडा यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार अमित गोरखे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त महानगरपालिका, प्रभागातील नगरसदस्य आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये सामाजिक संघटनांचा देखील सहभाग असून त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये इतिहास घडविणारा आणि ऐतिहासिक ठरणारा हा सांस्कृतिक उपक्रम सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने सुरू झाला असून तो भविष्यातही अखंडपणे सुरू राहील, असा विश्वास देखील आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केला.

१० ते १४ मे २०२६ या कालावधीत चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यान येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रबोधन पर्वाअंतर्गत ११ ते १३ मे २०२६ यादरम्यान शिपस्पर्श शिवसह्याद्री प्रतिष्ठान निर्मित ‘शिवरूद्र शंभुराजे’ या महानाट्याचे सादरीकरण होत आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर असलेले हे महानाट्य ॲड. विनय चंद्रकांत दाभाडे लिखित व दिग्दर्शित असून प्रतिक चंद्रकांत दाभाडे यांनी सहदिग्दर्शन केले आहे.

तीन मजली भव्य रंगमंच, २०० हून अधिक कलाकारांचा सहभाग, थरारक लढाईचे प्रसंग तसेच महाराष्ट्रातील विविध लोककलांचा समावेश असलेल्या या महानाट्यातून छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्षमय जीवनप्रवास प्रभावीपणे उभा करण्यात आला आहे. संभाजीनगर, चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानाच्या मागील बाजूस शिवशंभो उद्यानासमोर असलेल्या मोकळ्या मैदानात सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत हे महानाट्य रंगत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, स्वराज्याच्या विचारांचे संवर्धन करणे आणि इतिहासाबाबत जनजागृती घडवून आणणे हा या महानाट्याच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनाचे (१४ मे) कार्यक्रम

गुरूवार दि.१४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाद्वारे त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस तर १०.४५ वाजता बर्ड व्हॅली येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास खासदार, आमदार, महापालिकेचे पदाधिकारी,अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहणार आहेत.

तर सायंकाळी ५ वाजता शिवशाहीर सुरेश सुर्यवंशी आसंगीकर यांचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शाहीरीचा कार्यक्रम तर सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे “छत्रपती संभाजी महाराज-एक अद्वितीय योध्दे” या विषयावर व्याख्यान होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना शहरवासियांनी उपस्थित रहावे असे आवाहन महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.

Tags:

MLA Amit Gorkhe
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

पिंपरी चिंचवड क्रीडा क्षेत्रातही देशाला दिशा देणारे शहर ठरतेय – महापौर रवि लांडगे

Next

​पुणे जिल्ह्यात ‘हीट अलर्ट’!; दुपारच्या उन्हात कामावर निर्बंध, प्रशासनाचे कडक आदेश

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme