Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Uncategorized

Delhi-दिल्लीतील मराठी मंडळांना राज्य शासनाचा भक्कम आधार; मध्यवर्ती समिती स्थापन होणार – उदय सामंत

By Sumedh Chapalgaonkar
July 24, 2026 1 Min Read
0

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदन येथे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली व परिसरातील विविध मराठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. देशाच्या राजधानीत मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, या कार्यात योगदान देणाऱ्या सर्व मराठी मंडळांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी दिली.

बैठकीदरम्यान प्रतिनिधींनी दिल्लीमध्ये सुमारे साडेचार लाख मराठी भाषिक वास्तव्यास असून त्यांनी राजधानीत स्वतंत्र सांस्कृतिक ओळख निर्माण केल्याचे सांगितले. मराठी भाषा व संस्कृतीच्या जतनासाठी कार्यरत संस्थांना राज्य शासनाकडून आर्थिक तसेच संस्थात्मक पाठबळ मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी मंत्री सामंत यांनी सांगितले की, मराठी भाषा विभाग जागतिक स्तरावर मराठीचा विस्तार करण्यासाठी कार्यरत आहे. परदेशात ७५ आंतरराष्ट्रीय मंच आणि देशात ७५ बृहन्महाराष्ट्र मंडळांचे जाळे उभारण्याचे काम सुरू असून, कर्नाटक सीमाभागातील मराठी ग्रंथालयांसाठी दोन कोटी रुपयांच्या अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

दिल्लीतील ३० ते ५० लहान-मोठ्या मराठी मंडळांना एका छत्राखाली आणण्यासाठी ‘मध्यवर्ती समिती’ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या समितीच्या माध्यमातून गणेशोत्सवासह विविध सांस्कृतिक उपक्रम राबविणाऱ्या संस्थांना आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीला राज्यसभा खासदार रामराव वडकुते, कर्नाटकचे आमदार डॉ. मारोतीराव मुळे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांच्यासह दिल्ली व परिसरातील विविध मराठी मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

Strong support from the State Government for Marathi Mandals in Delhi; central committee to be formed – Uday Samant
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

*सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*

Next

Delhi-ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; मिराबाई चानू आणि लव्हलिना बोर्गोहेन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकाचा शानदार प्रवेश

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल
  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनापासून दूर राहा; दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा
  • पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींची कर्जमाफी; २४ जुलैपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर
  • दिल्लीतील आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा; अहिल्यानगरमध्ये दोन तासांचे मौन आंदोलन
  • Delhi-ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; मिराबाई चानू आणि लव्हलिना बोर्गोहेन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकाचा शानदार प्रवेश

CATEGORIES

  • Uncategorized (446)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (878)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल
  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनापासून दूर राहा; दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा
  • पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींची कर्जमाफी; २४ जुलैपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर
July 24, 2026

Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – विविध बँकांमधील खात्यांचा आणि एटीएमचा गैरवापर करून नागरिकांची लाखो रुपयांची...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-जंतर-मंतर आंदोलनापासून दूर राहा; दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींची कर्जमाफी; २४ जुलैपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

दिल्लीतील आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा; अहिल्यानगरमध्ये दोन तासांचे मौन आंदोलन

Sumedh Chapalgaonkar

अहिल्यानगर : दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी अहिल्यानगर...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; मिराबाई चानू आणि लव्हलिना बोर्गोहेन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकाचा शानदार प्रवेश

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली: स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे 23 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे (Commonwealth Games 2026) रंगतदार आणि...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-दिल्लीतील मराठी मंडळांना राज्य शासनाचा भक्कम आधार; मध्यवर्ती समिती स्थापन होणार – उदय सामंत

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदन येथे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली व...

Read More
July 24, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme