बावधन येथे बँक खात्यातून ६४ लाखांचे संशयास्पद व्यवहार

​पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – बावधन येथे बँक खात्याचा गैरवापर करून ६४ लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार करत नागरिकांची फसवणूक केली. ही घटना १ जानेवारी ते ३१ एप्रिल २०२६ या कालावधीत घडली.
श्रीकांत कैलास राठोड (रा. तळवडे, पुणे) व त्‍याचे इतर साथीदार यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. पोलीस शिपाई कावेरी रामन्नाथ बांगर यांनी बावधन पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते उघडून ६४ लाख ६५ हजार २३५ रुपयांचे आर्थिक व्यवहार केले व त्यातून भारतातील ६ नागरिकांची एक लाख एक हजार ४७८ रुपयांची फसवणूक केली. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *