बॉन्ड पेपर न दिल्याने तरुणास बॅटने मारहाण

पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – गाडीच्या व्यवहाराचा बॉन्ड पेपर देण्यास नकार दिल्याने एका २२ वर्षीय तरुणाला लाकडी बॅटने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना १७ जुलै रोजी माण येथील भोईरवाडीत घडली.
अविष्कार गोंडाबे (वय २४), सुमित सावंत (वय २२), तनिष्क शिंदे, जय पवार (वय २४) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. रोहन प्रकाश बोलके (वय २२, रा. भोईरवाडी, माण) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचा व्यवहार मिटवण्यासाठी आरोपींनी फिर्यादीकडे बॉन्ड पेपर मागितला. तो देण्यास नकार दिल्याने आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व बॅटने मारहाण करून डोके फोडले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *