गॅस बिल भरण्याच्या बहाण्याने पावणेदोन लाखांची फसवणूक

पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील गहुंजे येथे एका ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची गॅस बिल भरण्याच्‍या बहाण्‍याने चोरट्याने मोबाईलवर ए.पी.के. फाईल पाठवली. त्याद्वारे क्रेडिट कार्डची माहिती चोरून एक लाख ९९ हजरी १२८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना १० एप्रिल २०२६ रोजी घडली आहे.
संदिप कुमार गुप्ता (वय, पत्‍ता माहिती नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र नरहरी कोठनिस (वय ६७, रा. लोढा बेलमोडो टॉवर, गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी शुक्रवारी (दि. १२ जून) रोजी शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोठनिस घरी असताना आरोपीने त्यांना मुंबईच्या घराचे गॅस कनेक्शन बिल थकीत असल्याचे सांगून ते न भरल्यास कनेक्शन बंद करण्याची धमकी दिली. व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या महानगर गॅसच्या ए.पी.के. फाइलमध्ये फिर्यादीने क्रेडिट कार्डची माहिती भरताच, त्यांच्या खात्यातून पैसे परस्पर वर्ग करून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास शिरगाव पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *