दुचाकी चालकांकडून टेम्पोचालकाला मारहाण

​पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – भुकूम येथे किरकोळ अपघाताच्या कारणावरून दोन दुचाकीस्वारांनी टेम्पोचालकाला स्टीलच्या कड्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. २४ मे) रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्‍या सुमारास घडली.
श्लोक रावल आणि मोहित शर्मा (दोघे रा. वनालिका अपार्टमेंट, पिरंगुट, ता. मुळशी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहीत रघुनाथ घारे (वय १९, रा. पिरंगुट, ता. मुळशी) यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित घारे हा त्याचा सुपर कॅरी टेम्पो घेऊन जात होता. मानस हॉस्पिटलसमोर त्याच्या टेम्पोचा आरोपींच्या दुचाकीला धक्का लागला. यावरून आरोपी संतापले. त्यांनी टेम्पोची समोरील काच फोडली. त्यानंतर शिवीगाळ करत स्टीलच्या कड्याने आणि लाथाबुक्क्यांनी रोहितला मारहाण केली. यात तो जखमी झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *