रावेतमध्ये ‘क्रेझी लव्हर्स कॅफे’वर छापा; अंधाऱ्या खोल्यांचा धंदा उघड

पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – रावेत येथील ‘क्रेझी लव्हर्स कॅफे’मध्ये कोणताही परवाना नसताना तरुण-तरुणींना अंधाऱ्या खोल्यांमध्ये बसण्याची सुविधा पुरवल्याप्रकरणी दहशतवाद विरोधी शाखेने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
​या प्रकरणी कैलास किसन काशिद (वय २४, रा. शिवशंभो हौसिंग सोसायटी, तळेगाव दाभाडे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई अशोक बाळासाहेब वाघमारे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लूमिंग डेल अपार्टमेंटमधील या कॅफेमध्ये संशयास्पद प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकला असता, बाहेर केवळ कॉफी बोर्ड लावून आतमध्ये अंधाऱ्या खोल्या तयार करण्यात आल्याचे दिसून आले. येथे तरुण-तरुणींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात होती. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार पी. ए. शेलार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *