मुंबई : राज्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे.
“तुमच्या खासदारांनी तुमच्या पक्षाचा व्हीप झुगारून तुमचंच तोंड फोडलंय; हिंमत असेल तर राऊतांनी आडवे येऊन दाखवावे,” असा थेट हल्लाबोल नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, शिवसेनेतील अंतर्गत वाद, खासदारांच्या भूमिकांबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप सुरूच असून आगामी काळात संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
