मुंबई(mumbai) : मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर-कॉमेडी प्रकारात नवा प्रयोग म्हणून झी स्टुडिओज आणि Kyra Kumar Kreations घेऊन येत आहेत ‘भूतम् भयम्’ हा बहुचर्चित चित्रपट. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
“सबका समय आयेगा! पिक्चर च्या पडद्यावर ‘भूतम् भयम्’ चा तन्मय छायेगा” अशा दमदार टॅगलाइनसह या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा सिनेमा मराठी हॉरर-कॉमेडी विश्वात ‘गेमचेंजर’ ठरेल, असा दावा निर्मात्यांकडून केला जात आहे.
हा चित्रपट २४ जुलै २०२६ पासून देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रामचंद्र गावणकर यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असून नरेन कुमार आणि महेश कोरडे यांनी निर्मिती केली आहे. झी स्टुडिओज मराठी प्रस्तुत या चित्रपटामुळे प्रेक्षकांना भय आणि विनोद यांचा अनोखा अनुभव मिळणार आहे.
