Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
A person wearing a black balaclava adorned with rings and necklaces, creating an air of mystery.
पिंपरी-चिंचवड

pimpri chinchwad-उन्हाळी सुट्टीत रिकाम्या घरांवर चोरट्यांची नजर

By Sumedh Chapalgaonkar
May 17, 2026 2 Min Read
0

(pimpri chinchwad)-पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस सतर्क; सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक आणि शेजाऱ्यांच्या मदतीवर भर.

पिंपरी-चिंचवड ः उन्हाळी सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात नागरिक कुटुंबासह बाहेरगावी जात आहेत. याच काळात बंद घरांवर चोरट्यांची नजर असल्याचे नुकत्‍याच रावेतमध्‍ये झालेल्‍या घरफोडीच्‍या घटनेवरून दिसून आले. अवघ्‍या पावणे दोन तासांत चोरट्यांनी बंद घरात घरफोडी करून १५ लाखांचा ऐवज लंपास केला. पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित ठेवणे, सुरक्षा रक्षक नेमणे आणि बाहेरगावी जाताना शेजारी व स्थानिक पोलिसांना माहिती देणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहरात रोजीरोटीसाठी आलेले नागरिक मुलांना सुट्‌टी लागल्‍याने एप्रिल आणि मे महिन्यात आपल्‍या मूळ गावी जातात. तर काही कुटुंब थंड हवेच्‍या ठिकाणी फिरायला जातात. त्‍यामुळे या कालावधीत घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. बंद असलेल्‍या घरांचा चोरट्यांकडून फायदा घेतला जातो. त्यामुळे “दक्ष नागरिक, सुरक्षित परिसर” आणि “आपला शेजारी खरा पहारेकरी” अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

पोलिसांकडून विविध गृहनिर्माण संस्था, सोसायट्या आणि रो-हाऊस परिसरात बैठका घेत नागरिकांना जागरूक केले जात आहे. बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या जाण्या-येण्याची माहिती शेजाऱ्यांना तसेच स्थानिक पोलीस ठाण्याला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित परिसरात गस्त वाढविणे सोपे होणार आहे.

पोलिसांनी नागरिकांना घरात रोख रक्कम, सोन्याचे दागिने किंवा मौल्यवान वस्तू न ठेवण्याचा सल्ला दिला आहे. शक्य असल्यास किमती ऐवज बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत, असे सांगण्यात आले आहे. तसेच सोसायटी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू स्थितीत आहेत का याची तपासणी करावी. खराब कॅमेरे तातडीने दुरुस्त करावेत. ज्या ठिकाणी कॅमेरे नाहीत, तेथे नवीन कॅमेरे बसवण्यावर भर द्यावा, असेही सांगण्यात आले आहे.

उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील परिसर, फार्महाऊस आणि कमी वर्दळीच्या भागात पोलीस गस्त वाढवण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी पायी पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सुरक्षा रक्षकांना स्थानिक पोलिसांचे संपर्क क्रमांक देण्यात येणार आहेत.

रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संशयितांची चौकशी, अचानक नाकाबंदी आणि संवेदनशील भागात विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. मोकळ्या जागा, अंधारे रस्ते आणि आडबाजूच्या परिसरातही गस्त वाढवण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली.

घरफोड्या टाळण्यासाठी घ्या ही काळजी
– शेजाऱ्यांना प्रवासाची माहिती द्या
– घरात रोख रक्कम ठेवू नका
– दागिने बँक लॉकरमध्ये ठेवा
– सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित ठेवा
– सोसायटीत सुरक्षा रक्षक नेमा
– मुख्य दरवाजाला मजबूत कुलूप लावा
– रात्री बाहेरील दिवे सुरू ठेवा
– संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवा
– स्थानिक पोलिसांना माहिती द्या
– प्रवासाची माहिती सोशल मीडियावर टाळा

Tags:

Thieves Set Their Sights on Empty Homes During Summer Vacations
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

pimpri chinchwad-नवी सांगवीत ‘हातोडा’; तीन अनधिकृत आर.सी.सी. बांधकामे जमीनदोस्त!

Close-up shot of a traditional glass thermometer on a vibrant blue background.
Next

pimpri chinchwad-उन्हात दिलासा देणारा ‘ताडगोळा’ हिट; पिंपरी-चिंचवडकरांचा नैसर्गिक थंडाव्याकडे कल

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme