Pune crime-पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार अत्याचारादरम्यान मुलीचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील नसरापूर जवळ एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची दुर्देवी घटना घडली असून ,घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे तर संतप्त गावकऱ्यांकडून आरोपीला ताब्यात देण्यात यावे ह्या मागणी साठी मुंबई बंगलोर हायवे जाम करण्यात आल्यामुळे दोन्ही बाजूंनी 20 किलोमिटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तसेच परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आली असून अशाप्रकारे अत्याचार करण्याची तिसरी वेळ असल्याने आरोपीला आमच्या ताब्यात द्यावे अशी मागणी संतप्त गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
तर पुणे पोलीस अधीक्षकांकडून संतप्त गावकऱ्यांना शांतता राखण्याचे तसेच रस्ता मोकळा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे