Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

पिंपरी-चिंचवड

टँकरला ट्रकची धडक; मजूर ठार, चालक अटकेत

By Team News Beez
May 22, 2026 1 Min Read
0

​पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – संत तुकारामनगर मेट्रो रेल्वे स्टेशनखाली रस्‍ता दुभाजकातील झाडांना पाणी घालत असलेल्या पाण्याच्‍या टँकरला एका भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात टँकरसोबत काम करणाऱ्या २२ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. २१ मे) रोजी सकाळी ७:१० वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाला अटक केली आहे.
शामसुंदर शेषराम गौतम (वय २२, रा. आबा काटे चाळ, स्मशानभूमी जवळ, दापोडी. मूळ रा. उत्‍तर प्रदेश) असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या मजुराचे नाव आहे. नरेशकुमार सुरेंद्र दास (वय २४, रा. मु. पेदरगाव, महाराष्ट्र मेडिकलजवळ, पनवेल, जि. रायगड. मूळ गाव- मधुबनी, बिहार) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपी टक्र चालकाचे नाव आहे. याबाबत टँकर चालक गणेश शंकर जाधव (वय ३६, रा. आबा काटे चाळ, बौद्धविहार जवळ, दापोडी) यांनी गुरुवारी (दि. २१ मे) रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश जाधव हे संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन येथील पिलरखाली रस्‍ता दुभाजकामध्‍ये असलेल्‍या झाडांना टँकरने पाणी टाकत होते. याच वेळी आरोपी नरेशकुमार दास याने आपल्या ताब्यातील ट्रक (क्र. MH 43 BG 3020) हयगयीने आणि भरधाव वेगाने चालवून टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत टँकरचे मोठे नुकसान झाले, तसेच टँकरसोबत काम करणारा मजूर हा गंभीर जखमी झाला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पिंपरी पोलिसांनी याप्रकरणी ट्रक चालकाच्‍या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
​या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लोहार करीत आहेत.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

​म्हाडाचे रो-हाउस देण्याच्या बहाण्याने ७४ लाखांची फसवणूक

Next

पिंपरीत धारदार सत्तुरसह तरुण जेरबंद

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme