पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – जुना मुंबई-पुणे हायवेवर सोमाटणे येथील दर्ग्यासमोर एका भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना ४ जुलै रोजी सकाळी घडली.
भिमा अर्जन सावंत (वय ३६, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी, मूळ रा. भूम, धाराशिव) याला पोलिसांनी अटक केली आहे. दीप हितेन नागदा (वय २८, रा. आनंदनगर, तळेगाव दाभाडे) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची मैत्रीण पूजा पटेल हे रस्त्याच्या बाजूला स्कूटरवर थांबले होते. दरम्यान, आरोपीने टेम्पो (MH 12 FZ 7484) भरधाव चालवून दुचाकीस्वार प्रतीक कुलकर्णी याला चिरडले, ज्यात त्याचा मृत्यू झाला. तीच दुचाकी फिर्यादीच्या स्कूटरला धडकल्याने पूजा पटेल ही देखील गंभीर जखमी झाली. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.
भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू!
