पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बांधकाम साइटच्या स्टोअररूममधून एक लाख ५ हजार ६०० रुपये किमतीच्या अॅल्युमिनियम तारा चोरून नेल्या. ही घटना दि. १२ जून २०२६ रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे येथे घडली.
अतुल शंकर शिंगाडे (वय ३३, रा. टॉवर लाइन, तळवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. रवींद्र वाघु तुपे (वय ५०, रा. कुबेर प्रॉपर्टीज, आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे येथील व्ही.टी.पी. ग्रुपच्या बिल्डिंग साइटवर स्टोअररूमचे दार उघडे असल्याचा फायदा आरोपीने घेतला. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि लबाडीच्या उद्देशाने आरोपी इलेक्ट्रीशियन अतुल शिंगाडे याने साईटवरून ११० किलो वजनाच्या एक लाख ५ हजार ६०० रुपये किमतीच्या अॅल्युमिनियम तारा चोरून नेल्या. पुढील तपास बावधन पोलीस करत आहेत.
बिल्डिंग साइटवरून अॅल्युमिनियम तारांची चोरी
